Monday, August 27, 2007

माझ्या किवता

तू येतेसच मुळी वेळ परतण्याची सोबत घेऊन
काळालाही असते मग सरण्याची घाई |
अन् बावरलेल्या मनाला म्ह्णतेस जाताना
इतका लळा आमचा तर स्वारी थांबवत का नाही ||

मुसळधार पावसाच्या साक्षीने तुझा माझा चालायचा खेळ
तुझ्या वेळेचा नी माझा कधी जमला नाही मेळ |
येताना सावकाश येतेस आणी जाताना नेहमीच वेळेवर
भोळ्या मनाची कसरत तुझ्या घड्याळाच्या काट्यावर ||

कधी ऊन कोवळे कधी पावसाची सर |
धरणीशी खेळे जसा श्रावणाचा मेघ ||
तशी रूसतेस कधी, कधी हसतेस लाजून |
खेळतो मनाशी तुझा लटका राग ||

No comments: